एक्स्प्लोर
लाईव्ह टीव्हीव्हिडीओशॉर्ट व्हिडीओवेब स्टोरिज्फोटो गॅलरीपॉडकास्टमुव्ही रिव्ह्यू
यूजफुल
होम लोन EMI कॅलक्यूलेटर बीएमआय कॅलक्यूलेटर वय मोजा/ वय कॅलक्यूलेटर एज्युकेशन लोन EMI कॅलक्यूलेटर कार लोन EMI कॅलक्यूलेटर पर्सनल लोन EMI कॅलक्यूलेटर पेट्रोलचे दर डिझेलचे दर
मुख्यपृष्ठकरमणूकAnurag Kashyap Vicky Kaushal Chhaava Movie: 'मला 'छावा' आवडला नाही...', विक्की कौशलच्या हिट सिनेमाबाबत अनुराग कश्यप यांचं मोठं वक्तव्य
Anurag Kashyap Vicky Kaushal Chhaava Movie: दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी 'छावा' चित्रपटाबद्दल आपलं मत मांडलं आहे. ते म्हणाले की, त्यांना सिनेमा आवडला नाही आणि अभिनेता विक्की कौशलवरही त्यांनी भाष्य केलं.
By : श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई|Updated at : 21 Sep 2025 08:15 AM (IST)

Anurag Kashyap Vicky Kaushal Chhaava Movie
Source : ABP Majha
Anurag Kashyap Vicky Kaushal Chhaava Movie: विक्की कौशलचा (Vicky Kaushal) 'छावा' सिनेमा (Chhaava Movie) या वर्षातील सर्वात यशस्वी हिंदी चित्रपटांपैकी (Hindi Film) एक आहे. प्रदर्शित झाल्यानंतर देशभरात या सिनेमाची तुफान चर्चा झाली. चित्रपटाच्या कथानकाचं, अभिनयाचं आणि दिग्दर्शनाचं सर्वांनी कौतुक केलं. दरम्यान, चित्रपट निर्माते अनुराग कश्यप यांनी मात्र, अगदी सर्वांच्या प्रतिक्रियांच्या विरोधात मत व्यक्त केलं आहे. 'छावा' सिनेमा अपेक्षित होता, तितका आवडला नाही, असं अनुराग कश्यप म्हणाले आहेत. अनुराग कश्यप यांच्या वक्तव्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अनुराग कश्यप सध्या त्यांचा नवा सिनेमा 'निशांची'मुळे चर्चेत आहेत. सध्या ते त्यांच्या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. याचनिमित्तानं दिग्दर्शक, निर्माते अनुराग कश्यप यांनी लल्लंटॉपशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीशी संबंधित विविध विषयांवर भाष्य केलं. पण, यावेळी बोलताना अनुराग कश्यप यांनी 'छावा' सिनेमाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
"खाद्याला यातना देऊन जे काही घडत होते, ते मला नाही आवडत..."
यावर्षीचा सर्वात मोठा हिट सिनेमा 'छावा' सिनेमा फारसा आवडला नाही, असं अनुराग कश्यप म्हणाले आहेत. "छावा' पेक्षा मला तो चित्रपट हॉलिवूडच्या 'द पॅशन ऑफ द प्रिस्ट'सारखा वाटला. मला तो आवडला नाही...", असं अनुराग कश्यप म्हणाले आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले की, "मला असं वाटले की, एखाद्याला यातना देऊन जे काही घडत होते, ते मला नाही आवडत, मी बघू शकलो नाही. मी एकतर आता हिंदी चित्रपट पाहणं बंद केलं आहे. 'चमकीला', 'धडक 2', 'लापता लेडीज' काही मोजकेच चित्रपट पाहिले आहेत."
"...पण ती कहाणी सांगण्याची पद्धत मला नाही समजली"
'छावा' सिनेमाविषयी पुढे बोलताना ते म्हणाले की, "ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाल्यानंतर मी त्यातली काही दृश्य पाहिली, ज्याविषयी लोक चर्चा करत होते. विनीतसाठी मी ते पाहिले. विकी आणि विनीतचे जे शेवटचे दृश्य होते, ते मी पाहिले. मी याविषयी कोणतेही जजमेंट द्यायचे नाही, पण ती कहाणी सांगण्याची पद्धत मला नाही समजली, इतरांना कदाचित तेच आवडलं असेल."
"विक्की कौशल आणि माझ्यात फारसं बोलणं होत नाही..."
विक्की कौशलबद्दलही अनुराग कश्यप यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, "आता आमच्यात फारसं बोलणं होत नाही. मी त्याला किंवा कोणालाही जज करणार नाही. एखादा माणूस एखाद्या गोष्टीची निवड का करतो? हे त्याच्या स्वत:वरच अवलंबून आहे. मला एखादी गोष्ट सांगायची असेल, तर मी ती सांगतो. पुन्हा-पुन्हा तेच तेच बोलणं आवडत नाही. म्हणूनच मी मुंबई सोडून गेलो..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Anurag Kashyap On Virat Kohli: 'विराट कोहलीवर मी अजिबात बायोपिक करणार नाही, त्याऐवजी मी दुसऱ्या...'; अनुराग कश्यपनं ठामपणे सांगितलं
About the author श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Read
Published at : 21 Sep 2025 08:15 AM (IST)
Tags :
Actor Anurag Kashyap Vicky Kaushal ENTERTAINMENT BOLLYWOOD ENTERTAINMENT NEWS . Entertainment News Chhaava #Marathi News
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
Advertisement
Advertisement
Advertisement
व्हिडीओ
फोटो गॅलरी
ट्रेडिंग पर्याय
एबीपी माझा वेब टीम
Marathwada Liberation Day: मराठवाडा मुक्ती संग्रामदिन: स्थलांतरित मराठवाडा – चिंता व चिंतन
Opinion